
जेआरडी माझा
जनसुविधा योजनेमधून (स्वातंत्र्य नंतर दुसरी वेळ खडीकरण होत आहे) धानोरे ते वाळूज रस्ता खडीकरण व मुरुमीकरण रस्ता पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन भाजपा तालुका उपाध्यक्ष अमोल देशमुख यांच्या प्रयत्नातून व भाजपा तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आलेला होता. त्याचे आज प्रत्यक्षात कामास सुरवात करून धानोरे गावचे माजी सरपंच औंदुबर देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.

यावेळी कुर्डुवाडी पंचायत समिती सभापती पंडित (काका) देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, माजी सरपंच भारत (बप्पा) देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
स्वातंत्र्य पूर्व काळापासून ज्या रस्त्याकडे कायम दुर्लक्ष होते. या रस्त्यासाठी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्याकडे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या सहकार्याने पाठपुरावा करून तालुका उपाध्यक्ष अमोल देशमुख यांनी निधी उपलब्ध करून घेतला आहे.

या रस्त्यावर धानोरे गावासह वाळूंज त्याचबरोबर इतर गावातील नागरिकांना ये जा करावी लागते. त्याचबरोबर शेतमाल वाहतूक करण्यासाठी रस्ता गरजेचा आहे परंतु मागील अनेक दशकांपासून रस्त्याचे काम न झाल्यामुळे धानोरे वाळुज हा रस्ता अतिशय खराब झाला होता. त्याच बरोबर परगावचे विद्यार्थी आपल्या येथे चिखल तुडवत शिक्षणास येत होते. त्यांना होणाऱ्या ञासाला उपाय म्हणून मुंगीच्या रुपात आपण काय तरी करु शकतो. हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याचा आपण प्रयत्न करतो.

या उद्घाटन प्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या धानोरे गावातील पंचायत समिती सभापती झाल्यामुळे धानोरे गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये विकासाला चालना मिळणार आहे. भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन तसेच पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या सहकार्याने या भागातील रस्ते त्याचबरोबर मुलभूत सोयीसुविधा व इतर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष अमोल देशमुख, बाजीराव देशमुख, उपसरपंच मंगेश देशमुख, सज्जनराव देशमुख, मा. उपसरपंच अभिलाष देशमुख, मधूकर पाटील, बिरुदेव शेळके, धनंजय देशमुख,अकुंश मगर, काकासाहेब देशमुख, हरीभाऊ देशमुख, भिमराव देशमुख, बालाजी माळी, बालाजी माळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश पाटील, प्रविण पाटील यांच्यासह धानोरे मानेगाव सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.