कर्मवीर भाऊराव पाटील समाज सुधारक पुरस्कार२०२३
करमाळा प्रतिनिधी
यशकल्याणी संस्थेचे संस्थापक प्रा.गणेश करे-पाटील यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल करमाळा तालुका इंग्रजी भाषा अध्यापक संघाचा कर्मवीर भाऊराव पाटील समाज सुधारक पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला.
यावेळेस विचारपीठावर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारती पुणे येथील डॉ. श्रुती चौधरी ,डायट वेळापूरचे विषय समन्वयक प्रा. सुलतानचांद शेख,प्रा.सुखदेव गिलबिले सर, अॕड.बाबुराव हिरडे ,करमाळा गटविकास अधिकारी मनोज राऊत,
गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील,प्राचार्य.शहाजी ढोंबरे,प्रा.गुरुनाथ मुचंडे,प्रा.कल्याणराव साळुंखे,प्रा.किरवे सर,प्रा.लावंड सर,प्रा.तकीक सर,प्रा.जयेशजी पवार,प्रा.विष्णु शिंदे सर आदि मान्यवर उपस्थित होते.