
घारगाव ता करमाळा येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रातील रासायनीक खते व किटक नाशकांच्या दुकानातरेशन दुकानदार रेशन मालाचे वितरण करुन मोफत रेशन चे लाभार्थ्यांकडून उकळत आहे पैसे
मौजे घारगाव ता. करमाळा येथील स्वस्त धान्य दुकानातील नोव्हेंबर-2022 चा मोफत व डिसेंबर-2022 चा विकत (हा माल मोफत वाटावा असे शासनाचे निर्देश) रेशन माल हा बेकायदेशीर व गायरान मधील अतिक्रमण जागेतील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राच्या रासायनीक व किटक नाशकाच्या दुकानात रेशनचा माल उतरून तो वाटप करत असले बाबत…..
घारगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील नोहेंबरचा मोफत माल व डिसेंबरचा विकत(हा माल मोफत वाटावा असे शासनाचे निर्देश होते) रेशन माल श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रातील रासायनीक व किटक नाशकाच्या दुकानात उतरून वाटप करण्यात आला आहे .

बाळेवाडी येथील रेशन दुकानदार श्रीमती वाय. आर. नलवडे ( त्यांचा मुलगा शिवाजी नलवडे) यांना घारगांव चे रेशनमाल वाटपाचे अधिकार तहसीलदार यांचेकडून दिलेले होते या अधिकाराचा गैरवापर करत गावासाठी आलेला नोव्हेंबर-2022 चा मोफत माल हा त्रयस्थ व्यक्तिच्या घरी साठवून ठेवला आणि जानेवारी महिना संपत आला असताना सुध्दा अजून पर्यंत वाटप केलेला नाही . यामुळे संबंधित दुकानदार हा रेशन माल काळ्या बाजारात विकण्याच्या तयारीत होता. मात्र गावातील अनेक नागरीकांनी यावर आवाज उठवला.
तसेच डिसेंबर-2022 चा विकत माल त्रयस्थ व्यक्तीच्या घरी व अनाधिकृत बेकायदेशीर गायरान जागतील (अतिक्रमीत) श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रातील रासायनीक व किटकनाशकाच्या खते बियानाच्या दुकानात साठवून ठेवले आहे. तरी त्यामुळे गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवून नागरीकांना विषबाधा होण्याचा संभव आहे.

तरी संबंधित दुकानदाराने बेकायदेशीर पणे साठवलेल्या धान्याचे पंचनामे करून संबंधीतावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी गावातील संजय सरवदे किरण पाटील विकास पाटील व कल्याण होगले यांनी केली आहे.
या रेशन दुकानदाराला शासकीय स्तरावरुन आदेश होते की, डिसेंबर-2022 च्या रेशनमालाचे पैसे लाभार्थ्यांकडून घेऊ नयेत. मात्र या रेशन दुकानदाराने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिकांकडून मोफत धान्याचे पैसे गोळा केले.
गावातील सर्व लाभधारक आज तहसीलदार यांचेकडे दाद मागायला गेले असता उद्या सकाळी शासकीय पंचनामा केले जाईल असे तोंडी उत्तर देण्यात आले.

संबंधित घडलेल्या घटणेची निःपक्षपाती पणे व वस्तुनिष्ठ पणे चौकशी व्हावी अशी मागणी सर्व गावकरी यांनी केली आहे