
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु या प्रमाणात आमदार-खासदार नाहीत. लोकप्रतिनिधी वाढवायचे असतील तर, समाजातील लोकांना लोकामध्ये मिसळून काम केले पाहिजे. समाजविकासासाठी राजकर्ती जमात बनणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी केले.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहल या होळकर वाड्यामध्ये शनिवारी 6 वे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाचे अध्यक्ष सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खा. रामराव वडकुते, आ. डॉ. राहुल आहेर, चांदवडचे नगराध्यक्ष वैभव बागुल, तळोदा संस्थानचे जहागिरदार अमरजितराजे बारगळ, संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागताध्यक्ष शिवाजीराव ढेपले, मुख्य संयोजक बापुसाहेब शिंदे, बापू हाटकर, प्रा. आर.एस. चोपडे, संमेलनाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कर्णवर-पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा ॲड. जयश्री तेरकर, डॉ. आर.डी. शेंडगे, डॉ. हनुमंत किणीकर, डॉ. सौ. किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. प्रकाश महानवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. खा. रामराव वडकुते, दिव्य मराठीचे स्टेट हेड सुभाष बोंद्रे यांनीही मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी प्रास्ताविक केले.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनामध्ये परिसंवादामध्ये प्राचार्य धों.मा. गडदे, चंद्रकांत हजारे, राम लांडे, प्राचार्य मधुकर कलगरे, प्राचार्य डॉ, महेश चौरे आदींनी सहभाग घेतला. परिसंवादाबरोबरच कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. या समारंभात सामाजिक कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश पुजारी, प्राचार्य धों.मा. गडदे. प्राचार्य सिद्धारूढ बेडगणूर, डॉ. महादेव बनसोडे, पवन थोटे, डॉ. अहिल्या वाघमोडे, प्रा. डॉ, महेश चौरे आदींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासह इतर ठराव या संमेलनामध्ये पारित करण्यात आले. प्रा.आर.एस. चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप पार पडला.