करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची परंपरा कायम राखत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. मुथा अबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडमीचा विद्यार्थी सार्थक मकरंद वनारसे याने अत्यंत कमी कालावधीत अबॅकसच्या १० लेव्हल्स पूर्ण करत ‘अबॅकस मास्टर डिग्री’ प्राप्त केली आहे. पुणे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ‘अरिस्टो किड्स’ परीक्षेत त्याने हे उल्लेखनीय यश संपादन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल करमाळ्यात ११ एप्रिल रोजी यशकल्याणी सेवाभावी सदन येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश करे पाटील होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रामदास झोळ, प्रा. माया झोळ, डॉ. कविता कांबळे, डॉ. स्वाती बिले, उद्योजिका चंद्रकला मार्कड, प्रा. बाळकृष्ण लावंड आणि प्रा. उत्तम विटूकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सार्थक वनारसे याला सन्मानचिन्ह व ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, सार्थकने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार व ट्रॉफींचा मानाचा संग्रह उभारला आहे.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अबॅकस शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि गणितीय वेग मोठ्या प्रमाणात वाढतो, असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेटरपेक्षाही जलद गतीने गणिते सोडवून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली जाधव व समीक्षा थोरे या विद्यार्थिनींनी प्रभावीपणे केले. या यशामागे अकॅडमीच्या संस्थापिका मुथा मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. सार्थकच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *