करमाळा प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (ह्यूमन राइट्स) च्या तालुकाध्यक्षपदी करमाळा येथील दिनेशकुमार हुकुमचंद मुथा यांची निवड करण्यात आलेली आहे.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे व महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आलेली आहे.

या निवडीनंतर नूतन अध्यक्ष दिनेशकुमार मुथा यांनी सांगितले की, संघटनेच्या नियमांचे पालन करेन व करमाळा तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देईल.

या निवडी नंतर मुथा यांचे करमाळा तालुक्यातूनच नव्हे तर संघटनेच्या राज्य व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा व अभिनंदन होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *