कोल्हापूर संचलित गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा २०२३ उत्साहात संपन्न .

दि .२९ करमाळा येथील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात कोल्हापूर संचलित गुरुकुल परीक्षा शांत वातावरणात पार पडली असे प्रतिपादन करमाळा तालुका गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेचे संचालक डॉ. सचिन जौंजाळ यांनी केले. कोरोना संसर्ग आजारामुळे गेली दोन-तीन वर्ष ही परीक्षा होऊ शकली नाही परंतू या वर्षी संपूर्ण करमाळा तालुक्यातून ६३० विदयार्थी या परीक्षेला बसले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना स्पर्धा परीक्षा कशी असती ही माहीती व्हावी म्हणून ही परीक्षा गेली १० वर्षापासून करमाळा तालुक्यात घेतली जाते असेही जौंजाळ सर म्हणाले. ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. बिभिषण मस्कर,  प्रा. दिलीप थोरवे, भागवत बरडे सर, सुरेश फुंदे,  चित्तरंजन सुरवसे सर, साबळे सर,  पोळके सर,  रवींद्र ढवळे सर यांचे सहकार्य लाभले .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *