
माॅ जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
जेआरडी माझा
माॅ जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिली आहे. असता त्यांनी त्वरित सचिवांना आदेश दिले स्वराज्य जननी माँ जिजाऊ साहेबांचे माहेरघर असूनही सिंदखेडराजा विकासापासून कोसो दूर कसे ? असा प्रश्न सातत्याने १२ जानेवारीला अभिवादन करण्याकरिता येणाऱ्या लाखोंच्या जिजाऊ भक्तांना सातत्याने पडतो आहे . त्यामुळे जिजाऊंचे जन्मस्थळाच्या विकासासाठी आता संघटनेच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करणार करणार असे आश्वासन मी 12 जानेवारीच्या जिजाऊ जन्मोत्सव दिनानिमित्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती स्वराज्याचे दोन छत्रपती घडविणाऱ्या माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असून सुद्धा मातृतिर्थाचा कुठल्याच विकास न झाल्याची खंत मी त्या वेळी व्यक्त केली

होती. यामध्ये प्रामुख्याने जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजेंच्या राजवाड्याचे पुरातत्व खात्याने सुशोभीकरन करणे आवश्यक आहे . निलकंठेश्वर बारव , रामेश्वर मंदिराची भिंत , चांदणी व मोती तलावाच्या भिंती , साहूकर वाडा , रंगमहाल , पुतळा सिंदखेड राजा : माहिती देतांना मी व उपस्थित पदाधिकारी बारव या ऐतिहासिक वास्तू आज पडझड होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . पुढील पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने या ऐतिहासिक वारशांचे जतन होणे आवश्यक आहे . राजवाड्यात राजे लखुजीराव जाधव यांचा सिंहासनरूढ पुतळा पुरातत्व खात्याने बसवावा जेणेकरून येथे येणाऱ्या शिवभक्तांना लखुजीराजे कोण होते याची निदान माहिती तरी होईल . तसेच समृद्धी महामार्गावरील फ्लाय ओव्हरवर जिजाऊंचा भव्य पुतळा बसवेने आवश्यक असून यामुळे जिजाऊंची तसेच या जन्मस्थळाची माहिती पोहचू शकेल , अशा अनेक विकासात्मक कामाचे निवेदन आज कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना दिले असता त्यांनी तात्काळ सचिवांना आदेश देऊन सदर विषयी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या

