
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी सुनील गोरे यांच्या घरातून रोख रक्कम व अर्धा तोळा सोन्याची अंगठी अज्ञात व्यक्तीने चोरल्याची पोलिसात बुधवारी तक्रार केली होती.

सुनील गोरे यांनी तक्रार करताना असे सांगितले की, बुधवारी सकाळी घरात एकटे असताना घरातील पसारा आवरण्याचे काम करत असताना त्यांनी हातातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी काढून बेडच्या गादी खाली ठेवली व नंतर ते बाहेर गेले. संध्याकाळी चार वाजता घरी आले असता मागचा दरवाजा उघडून अज्ञात व्यक्तीने घरातील 15000 रु. रोख रक्कम व 75000 रु. किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी चोरी केल्या बाबत तक्रार दिली होती.

याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली अजित उबाळे, मनीष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल, शेख यांनी तपास करून आरोपी करण भोसले, ओंकार रजपूत, विधी बालक यांना गोपनीय बातमीदारामार्फत व सीसीटीव्ही फुटेजद्वारे अटक करण्यात आले आहे.