करमाळा प्रतिनिधी

फॅबटेक मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ जून २०२४ ते ३१ मार्च २०२६ या २१ महिन्यात आपल्या करमाळा शाखेने सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून टीम वर्क पद्धतीने काम केले व त्यामुळे सर्वांनी मिळून चालू महिन्यापर्यंत एकूण ठेवी- ६,१५,००,०००/- (सहा कोटी पंधरा लाख रुपये), गोल्ड लोन -२,३२,००,०००/- (दोन कोटी बत्तीस लाख रुपये), इतर लोन- ३,०६,००,०००/- (तीन कोटी सहा लाख रुपये), एकुण नफा ३२,१०,०००/-,  एकुण  व्यवसाय:- ११,५३,००,०००/- (अकरा कोटी त्रेपन्न लाख रूपये) असे मार्च २०२६ पर्यन्त एकुण व्यवसाय केला आहे. त्याबद्दल सर्व ठेवीदार, कर्जदार, करमाळा शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

इथून पुढे ही असेच टीम वर्क पद्धतीने काम करून बिझनेसचा चांगला रिझल्ट आणूयात व आपल्या संस्थेच्या प्रगतीला सर्वांनी मिळून हातभार लावुया. असे कर्मचारी अधिकारी यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *