फिसरे ग्रामपंचायतीने केला महाविदयालयात येऊन एन एस एस टीमचा सन्मान

करमाळा दि.२६/०१/२०२३ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, अधिक दोन स्तर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी फिसरे येथे  वृक्षारोपण, ग्रामसफाई आणि सामाजिक प्रबोधन करून गावामध्ये एक आदर्श निर्माण केला या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फिसरे गावचे सरपंच प्रदीप दौंडे, माजी सरपंच संदिप नेटके, सदाशिव रोकडे, सुमीलदादा नेटके, झुंबरलाल पाटील, रमेश काटे, नंदू पाटील, साई फडतरे प्रभृति महाविद्यालयामध्ये आले आणि   शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन तसेच शिबिराचे प्रमुख प्रा. लक्ष्मण राख यांचा विशेष सत्कार करून महाविद्यालया प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल बी पाटील होते तर विद्या विकास मंडळाचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, प्रा प्रदीप मोहिते हे मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी फिसरे येथील ग्रामस्थांनी भावनिक होवून आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि समाजसेवेच्या संस्कारातून देशाची सेवा करावी अशी अपेक्षा विलासराव घुमरे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा लक्ष्मण राख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा सुजाता भोरे व प्रा. मुन्नेश जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा बिभीषण मस्कर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *