वांगी नं.३ येथे 26 जानेवारी रोजी सोमनाथ  खराडे यांचा सन्मान करण्यात आला आहे

स्टार्टअप बिजनेस  2022 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वांगी गावचे सुपुत्र इंजिनिअर सोमनाथ बाळू खराडे यांचा प्रजासत्ताक दिनाचे ( 26 जानेवारी ) औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल वांगी नंबर 3 येथे ज्येष्ठ नेते मा. श्री महादेव आबा रोकडे यांचे हस्ते  सत्कार करण्यात आला.यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर,  सरपंच मा श्री मयूर रोकडे आदिनाथ चे संचालक पांडुरंग जाधव, मकाईची संचालक संतोष देशमुख, उपसरपंच संतोष कांबळे, सदस्य सोमनाथ रोकडे चंद्रकांत कदम सोसायटीचे सदस्य दिनकर रोकडे माजी पंचायत समिती सदस्य सुहास नाना रोकडे ग्रामपंचायत सदस्य शंकर जाधव, अर्जुन तकिक ,सुतार सर , पोलीस पाटील गहिनीनाथ शिरसागर यांचे सह शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद विद्यार्थविद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

वांगी नंबर ३ गावचे सुपुत्र

 सोमनाथ बाळू खराडे

एसके इंजिनिअर्स ॲन्ड सर्व्हिसेस, पुणे चे मालक

गव्हर्नमेंट काॕन्ट्रॕक्टर

भारत सरकारच्या गोवा राज्यातील स्वच्छ भारत मिशन चे तांत्रिक सल्लागार

स्टार्टअप पुरस्कार २०२२ चे मानकरी

२ मार्च रोजी सिंगापूर -मलेशिया व्यावसायिक अभ्यास दौऱ्या साठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील २० युवा उद्योजकां मध्ये निवड

चालू कामे – महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील १९ नगरपालिका व ३ महानगरपालिका व भारत सरकारचा गोवा राज्यातील स्वच्छ भारत मिशन चा प्रोजेक्ट

प्राथमिक शिक्षण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांगी नंबर ३

माध्यमिक शिक्षण : रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, वांगी नंबर ३

उच्च माध्यमिक शिक्षण : रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी महाविद्यालय, कर्जत

पदवी शिक्षण : SVPM’s काॕलेज आॕफ इंजिनिअरींग, माळेगाव (बारामती)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *