
राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेसाठी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या ओंकार घाडगे ची निवड* …
केम तालुका करमाळा येथील श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज मधील खेळाडू ओंकर धनंजय घाडगे यांनी दि. 23 पंढरपूर या ठिकाणी झालेल्या विभागीय थाळीफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याची आता महाराष्ट्र राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी ओंकार घाडगे या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवलेले आहे श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेजमधील विद्यार्थी आत्तापर्यंत निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, ऑनलाइन स्पर्धा, परीक्षा, अशा विविध राज्यस्तरात संपत आहेत क्रीडा क्षेत्रात देखील या वर्षी या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी दर्शवली आहे.

ओंकारच्या यशासाठी त्याला मार्गदर्शक म्हणून क्रीडाशिक्षक प्राध्यापक अमोल तळेकर सर यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच त्याचे वडील श्री धनंजय हनुमंत घाडगे यांनी त्याला लहानपणापासून या खेळासाठी प्रोत्साहन दिले आहे. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्य सौ शुभांगी ताई गावडे संस्थापक सीईओ. श्री, कौस्तुभजी गावडे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख सर, प्राचार्य श्री एस बी कदम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर उपाध्यक्ष उज्वला ताई संदीप तळेकर, यांनी अभिनंदन केले या स्पर्धेसाठी त्यास प्रा. डॉक्टर मच्छिंद्र नांगरे सर प्रा. संतोष साळुंखे, प्रा, संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे ,श्री कुंडलिक वाघमारे, श्री सफ्रंराज मोमीन, यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल ओंकार घाडगे यांचे सर्वत्र केम ग्रामस्थ व करमाळा तालुक्यातील सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील पै. महावीर आबा तळेकर, युवा सेना सोलापूर जिल्हा समन्वय सागर राजे तळेकर, भाजप तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, भाजप नेते विकास कळसाई, आजिनाथ जाधव गुरुजी दत्तात्रय तळेकर, इतर गावातील ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


