
अखेर राजुरी परिसर आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून उजळणार (३३ केव्ही वीज उपकेंद्राला मंजूरी)
ता. 25 : करमाळा तालुक्यातील मौजे राजुरी येथील शेतकरी व नागरिकांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ३३ केव्हीचे सब स्टेशन उभारण्याला स्टेशनला मंजुरी मिळाल्याची माहिती राजुरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच व सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली.

अनेक वर्षांपासून राजुरीतील शेतकरण्यांना विजेचा प्रश्न जाणवत होता, शेतीपंपाच्या विजेचा अक्षरशः खेळखंडोबा झाला होता, त्यामुळे शेतकरी भयानक त्रस्त होते ,मामांनी कायस्वरूपी विजेची अडचण सोडवण्यासाठी राजुरीसाठी स्वतंत्र वीज बोर्ड केल्याशिवाय पर्याय नाही, यावेळी पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करून, राजुरी आणि पोमलवाडी सब स्टेशन करिता मागणीचा पाठपुरावा चालु केला होता, त्यापैकी राजूरीला सब स्टेशन आणि कविटगाव व कव्हे येथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर ला मंजुरी मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील कात्रज, आवाटी, रायगाव व इतर ठिकाणी देखील मागील कालावधीत कामे मार्गी लावलेली असून राजुरी येथील सब स्टेशनसह सर्व कामे लवकरच चालू होतील, राजूरी

सबस्टेशन व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी आमदार संजयमामा शिंदे यांचे कडे सरपंच डॉ. दुरंदे व नंदकुमार जगताप यांनी सतत पाठपुरावा केला
सबस्टेशन व आरोग्य उपकेंद्रासाठी लागणारी गायरानची जागा केवळ 6 महिन्यात जिल्हाधिकारी कडून प्रशासकीय मंजुरी मिळवण्यात यश आले.यासर्वकामी तहसीलदार समीर माने,mecb चे सुमित जाधव साहेब,आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अंबोले साहेब, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे यांनी विशेष सहकार्य केले
