करमाळा प्रतिनिधी

फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पार पडली. 12 मार्च रोजी करमाळा तालुका पंचायत समिती सभापतीपदी भाजपाच्या पूजा ढेरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अजित विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आहे.

करमाळा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी व शहरी विकास आघाडी यांचे समसमान म्हणजेच 4-4 उमेदवार निवडून आले होते. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, संजय मामा शिंदे, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांचे भाजप व राष्ट्रवादी मिळून 8 सदस्य व आमदार नारायण पाटील यांचे सदस्य निवडून आले होते. असे मिळून बहुमत हे भाजप राष्ट्रवादी कडे असल्यामुळे सभापती या पदावर अडीच वर्षे भाजप व अडीच वर्ष राष्ट्रवादीचे सदस्य राहणार आहेत तर उपसभापती पद दरवर्षी बदलले जाईल.

करमाळा तालुका पंचायत समिती सभापती व उपसभापती पद निवडीची प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे यांनी काम पहिले तर त्यांना सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम होते.

यावेळी सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *