करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. स्कूलचे संस्थापक/अध्यक्ष जयंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन करण्यात आले. या नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स, विज्ञान प्रयोग तसेच गणितातील संख्यज्ञान, बेरीज, वजाबाकी, पाढे इ.विषयीचे प्रदर्शन भरवले होते. यामध्ये ज्वालामुखी, सूर्यमाला, जलचक्र, पाण्याची घनता, हवेचा दाब इ. प्रयोग सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे यामध्ये प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. या प्रदर्शनासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली होती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *