करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रंगपंचमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रार्थना व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी विद्यार्थ्यांना रंगपंचमीचे महत्त्व सांगत एकतेचा, आनंदाचा आणि मैत्रीचा संदेश दिला. 

सर्वांनी एकमेकांना पर्यावरणपूरक रंग लावून आनंद व्यक्त केला. शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांसोबत रंगांच्या उधळणीत सहभाग घेतला. सुरक्षिततेची काळजी घेत रंगांचा वापर करण्यात आला. 

मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी सांगितले की, रंगपंचमी हा उत्सव केवळ रंगांचा नाही तर सामाजिक सौहार्द, एकता आणि मैत्रीचा प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी हा उत्सव सामाजिक बंध वाढविण्यासाठी साजरा करावा, असे त्यांनी आवाहन केले. 

अखेर गाणी, खेळ आणि रंगांच्या उधळणीने संपूर्ण शाळा आनंदाने रंगली. विद्यार्थ्यांनी उत्सव साजरा करून एकतेचा व मैत्रीचा संदेश दिला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *