
आज मराठा क्रांती मोर्चा व शिव-शंभूप्रेमींकडून लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश केल्याबद्दल सत्कार संपन्न
मुंबई ,(प्रतिनिधी दिनांक 20 )छत्रपती संभाजी महाराजांचा थोर महापुरुषांच्या यादीमध्ये दिनांक 18 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे संभाजी महाराजांच्या जयंतीचा म्हणजे 14 मे चा जयंतीचा समावेश केला याबाबतचे परीपत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे-पाटील, महेश राणे आणि शिवशंभु प्रेमी यांनी वर्षा या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आणि भगवी शाल देऊन सत्कार केला गेल्या अनेक वर्षापासून मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज वेगवेगळ्या सामाजिक संघटना,शिवशंभु प्रेमी,अठरापगड जातीतील सर्व बांधव छत्रपती संभाजी महाराजांचा थोर महापुरुषांच्या यादीत समावेश व्हावा व त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात ,निमशासकीय कार्यालय ,खाजगी क्षेत्रातील विविध आस्थापनामध्ये

जयंती साजरी व्हावी या मागणीसाठी पाठपुरावा करत होते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या पुढाकाराने हे परिपत्रक निघाल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आता शासन स्तरावर सुद्धा साजरी होणार असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा,मराठा समाज शिवशंभू प्रेमी आणि अठरापगड जाती धर्मातील मावळे सर्वसामान्य जनता आणि विविध सामाजिक संघटना या निर्णयाने आनंदित झाले आहेत,त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या व विविध संघटनेच्या शिष्टमंडळाने आज ना.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती व भगवी शाल देऊन या निर्णयाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील स्मारकासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा,किल्ले पुरंदर या संभाजी महाराजांच्या जन्मस्थानाचा विकास करावा,मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनेक मागण्या करण्यात आल्या यावेळी संग्रामसिंह भोसले ,दुर्वा दळवी ,अनुप फंड ,धनंजय यमपुरे ,बाळासाहेब घोरपडे , सुरेश ठाणगे, प्रवीण कुरुंद,समाधान कागदे, अर्जुन जाधव,शिवाजी जाधव, किसन जाधव रामेश्वर खामकर,श्री वाघ आदी उपस्थित होते.

