
करमाळा प्रतिनिधी
जेऊर शिवजन्मोत्सव समितीची उद्या बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना समितीकडुन सांगण्यात आले की, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी सात वाजता शिवजयंती उत्सव नियोजन घेण्यात येणार आहे. या बैठकीत यंदाच्या शिवजयंती विषयी विविध कार्यक्रम व मिरवणुक यासंबंधी चर्चा व नियोजन

करण्यात येणार आहे. सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी जेऊर ता. करमाळा येथे शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदाही येथील ग्रामस्थ, शिवप्रेमी व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या प्रयत्नातून एका भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याने त्याची पुर्व तयारी म्हणुन ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी उद्या शुक्रवारी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी जेऊर येथे आयोजित केलेल्या नियोजन बैठकीस शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

