
चालकाच्या पायात लक्ष्मी असते असे म्हणतात आणि हे खरेच आहे – आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत
करमाळा प्रतिनिधी
चालकाच्या पायात लक्ष्मी असते, असे म्हणतात आणि हे खरेच आहे असे अध्यक्ष स्थानावरून बोलताना आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत बोलत होत्या. कारण जेव्हा चालक ब्रेक लावून बस थांबवतो व रत्यावर थांबलेला प्रवासी बस मध्ये घेतो तेव्हा महामंडळाला तिकिटाच्या रूपात उत्पन्न मिळते. जेव्हा तोच चालक अक्सलरेटर व क्लच चा व्यवस्थित वापर करतो तेव्हा तो इंधनामध्ये बचत करत असतो. कोरोना कालावधी व संप कालावधी यांना तोंड देऊन महामंडळ पुन्हा प्रवासी सेवेसाठी सुसज्ज झालेले आहे. परंतु या संकटांमुळे प्रवासी संख्येत झालेली घट भरून काढत असताना बचत करणे देखील गरजेचे आहे.

महामंडळात पगारीनंतर चा सर्वात जास्त खर्च हा इंधनावर होत आहे. तरी इंधन बचत करणे व उत्पन्न वाढवणे याकडे आपण सर्वानी लक्ष देणे गरजेचे आहे.
यावेळी आगाराचे सहाय्य्क कार्यशाळा अधीक्षक श्री. आनंद रोमन यांनी देखील सर्व चालकांना व यांत्रिक कर्मचाऱ्यांना सूचना देत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी करमाळा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री. संजय कदम, लेखाकार श्री. परमेश्वर जावळे उपस्थित होते. तसेच आगारातील चालक – वाहक, कार्यशाळा कर्मचारी व प्रधासकीय कर्मचारी उपस्थित होते.

