
मातंग एकता आंदोलनचे कार्याध्यक्ष अविनाश सर बागवे साहेब यांची करमाळा शहरास धावती भेट
मातंग एकता आंदोलन’चे कार्याध्यक्ष, मातंग समाजाचे अभ्यासू व्यक्तिमत्व, नगरसेवक अविनाश सर बागवे हे कामानिमित्त करमाळा येथे आले असता त्यांनी करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंदिर पुजारी ओंकार पुजारी, रवींद्र सोरटे, विजय सोरटे तसेच व्यवस्थापक अशोक गाठे ,पद्माकर सूर्यपुजारी यांनी श्री. बागवे यांचा मानाचा फेटा, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि श्री कमला देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला.
यावेळी ‘मातंग एकता आंदोलन’चे अध्यक्ष विठ्ठल थोरात, जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, तालुका अध्यक्ष शरदभैय्या पवार, शहराध्यक्ष युवराजभाऊ जगताप, युवाध्यक्ष दत्ता चव्हाण, शेतकरी संघटनेचे अण्णा सुपनवर, युवा नेते अभिजीत मंडलिक उपस्थित होते.


