
पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल संपलेला असून देखील बेकायदेशीर कार्यालयाचा वापर होत आहे
करमाळा प्रतिनिधी
पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल संपलेला असून देखील बेकायदेशीर कार्यालयाचा वापर होत आहे याबाबतचे निवेदन
गटविकास अधिकारी
पंचायत समिती, करमाळा यांच्याकडे देवानंद महादेव पाटील,बाळासाहेब एकनाथ कर्चे,
बालाजी चंद्रकांत गावडे यांनी देण्यासाठी केले आहे .पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल संपलेला असून
देखील संबंधित माजी पदाधिकारी व सदस्य यांच्याकडून सभापती,
उपसभापतीसाठी असलेल्या कार्यालयाचा व शासकिय यंत्रणेचा
बेकायदेशीपणे वापर व जेऊर गामपंचायत येथे प्रशासक नेमणूक असून
देखील गामपंचायत कार्यालयाचा वापर राजकीय व पक्षीय कामकाजासाठी

होत असल्याबद्दल त्यांनी म्हटले पंचायत समितीच्या लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यामुळे मार्च 2022 मध्येच सर्व जि.प. व पं.स. बरखास्त करण्यात आलेल्या असून सध्या प्रशासकिय कारभार सुरू आहे. हे आपणास विदित आहेच. असे असताना आपल्या कार्यालयतील सभापती, उपसभापतीसाठी असलेल्या कार्यालयामध्ये संबंधित माजी पदाधिकारी व सदस्य अनाधिकाराने व बेकायदेशीरपणे येऊन बसत आहेत. तसेच कार्यालयतील कर्मचारी व अधिकारी वर्गावर विनाधिकाराने हुकुमत गाजवत असल्याचे दिसून येत आहे.
मार्च 2022 पासून ते आज पर्यंत सभापती महोदयांच्या शासकीय गाडीचे रिडींग तपशील देखील उपलब्ध व्हावे. सदर गाडी पंचायत समितीने ताब्यात का घेतली नाही? याचाही खुलासा करावा.
जेऊर गामपंचायत येथे देखील प्रशासक नेमणूक आहे. तेथेही गामपंचायत कार्यालयाचा वापर राजकीय व पक्षीय कामकाजासाठी होत आहे. तरी जेऊर गामपंचायत कार्यालयातील गामसेवक यांची खोली वगळता इतर खोल्या सील करण्यात याव्यात.

अन्यथा आम्हास तीव आंदोलन छेडावे लागेल, याची कृपया नोंद घ्यावी. तेव्हा या प्रकारणी आपण योग्य ती कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी व सदर कार्यालयास कुलुप लावून, या बेकायदेशी प्रकाराला आळा घालावा अशी मागणी
देवानंद महादेव पाटील, बाळासाहेब एकनाथ कर्चे, बालाजी चंद्रकांत गावडे यांनी केली आहेअधिक माहितीस्तव प्रत : मा.गामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32. विभागीय आयुक्त, विधान भवन, पुणे, जिल्हााधिकारी साहेब, सोलापूर. मुय कार्यकारी अधिकारी, जि.प., सोलापूर,संजयमामा शिंदे, आमदार, करमाळा, तहसीलदार साहेब, करमाळा, निवडणूक निर्णय अधिकारी, करमाळा.

या संदर्भात नियमाने तसे करता येत नाही संबंधित पदाधिकारी हे कार्यालयात येतात, बसतात, ग्रामीण भागाच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी याबाबत त्या संबंधितांचे निवेदन आले आहे.- मनोज राउत गटविकास अधिकारी