करमाळा प्रतिनिधी

आज करमाळा येथे आमदार नारायण पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत पंचायत समिती(शिक्षण विभाग)यांच्या वतीने तालुका स्तरीय किशोरी मेळावा पार पडला त्यावेळी उपस्थित राहून प्रतिमेचे पूजन केले.
त्या कार्यक्रमानिमित्त बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले की,सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या,ज्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्याचबरोबर पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि विधवा पुनर्विवाहा साठी लढा दिला,महिला सक्षमीकरण व शिक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य केले,म्हणून सावित्रीबाई फुले यांना ‘क्रांतिज्योती’ म्हणून ओळखले जाते असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.यावेळी मान्रवरांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी नितीन कदम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी समितीचे माजी सभापती अतुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ.अमित कदम, विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले,गट शिक्षण अधिकारी नितीन कदम,शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे व करमाळा तालुक्यातील किशोरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *