करमाळा तालुक्यातील नूतन पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन संपन्न…
करमाळा : (प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात २१ नवीन पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले आहेत.
यापैकी करमाळा तालुक्यातील आळजापूर व हिवरे येथील नूतन मंजूर झालेल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आ.नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी पंढरपूर डाक विभाग अधीक्षक मुन्ना कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अमरजीत साळुंके, जि.सरचिटणीस संतोष वारे, भरतरीनाथ अभंग, आळजापूर चे सरपंच संजय रोडे, हिवरे चे सरपंच दत्तात्रय घाडगे, उपसरपंच अतुल फरतडे, हरिश्चंद्र पाटील, आदिनाथ चे संचालक डॉ.अमोल घाडगे, देवानंद बागल उपस्थित होते.
यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी गावात नव्याने सुरू झालेल्या पोस्टाच्या बँकिंग, कुरिअर , विमा सुरक्षा व इतर सेवांचा लाभ घ्यावा असे सांगीतले आणि पोस्टाच्या सेवेबाबत ग्रामस्थांना विश्वास दिला.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाळासो पवार, ॲड.प्रशांत बागल, शिवाजी पाटील, सुदर्शन तळेकर,आबासाहेब टापरे,हनुमंत पाटील, महेश पाटील, मच्छिंद्र रोडे, शिवाजी जाधव,अमोल जाधव, नानासाहेब मगर, विजय विटूकडे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
