
डिकसळ रोडवरील पुलाच्या आठव्या मोरीला भगदाड पडले,दुर्घटना होण्याची शक्यता आहे ? – उपसरपंच गलांडे
करमाळा प्रतिनिधी
कोंढार चिंचोली डिकसळ रोडवरील पुलाच्या
आठव्या मोरीला भगदाड पडले आहे अपघात होण्याची शक्यता आहे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्दावे अशी मागणी कोंढार चिंचोलीचे उपसरपंच श्रीराम गलांडे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, या भागातून मोठ-मोठी ऊसाची वाहतूक,चोरून वाळु पळवत आहे, वाहनत सेच जड वजनाचे वाहन जात असल्यामुळे पुल धोकेदायक झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागा अधिकाऱ्यांनी या परिसरात धोकेदायक पुल म्हणून बोर्ड लिहिला आहे.येथून फक्त टू व्हीलर वाहने जाण्याची परवानगी आहे तरी या भागातुन जड वाहतूक होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्घघटना घडायच्या आगोदर योग्य ते नियोजन करावे असे उपसरपंच गलांडे यांनी सांगितले आहे.
…..
जड वाहने जाऊ नये म्हणुन बँरीगेट बसवले होती तेथील नागरिकांनी ते काढले आहे त्या परिसरात जड वाहने जाऊ नये म्हणून आम्ही आजून काय करू शकतो ते सांगा – मा उबाळे सो,सार्वजनिक बांधकाम अधिकारी, करमाळा


