
करमाळा प्रतिनिधी
कंदर केंद्रातील सर्व शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार वस्ती केंद्र कंदर या ठिकाणी आयोजित केली होती. या शिक्षण परिषदेमध्ये पद्म पंडित प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी सर्व शिक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था उत्तम प्रकारे करून सर्व शिक्षकांची मने जिंकली.
पद्म प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अण्णासाहेब पवार हे नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असतात ते वेगवेगळ्या शैक्षणिक सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजसेवा करतात. या शिक्षण परिषदेमध्ये त्यांनी सर्वांचा यथोचित सन्मान करून सर्वांची मने जिंकली. या शिक्षण परिषदेसाठी जेऊर बीटचे विस्तार अधिकारी जयवंत नलवडे यांनी अण्णासाहेब पवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला व त्यांचे आभार मानले हे कार्य ते निष्पापणे मनोभावे करतात. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीची साथ लाभते. त्यांनी शिक्षण परिषदेमध्ये सर्व शिक्षकांची भोजनाची व्यवस्था केल्यामुळे कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार करून आभार मानले. कंदर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक सहशिक्षक यांनी त्यांचे मनापासून आभार मानले व त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
