जय महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व संचालक बिनविरोध

कमलाई नगरी

जय महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व संचालक बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राखत सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर यापुढे देखील पतसंस्थेचे कामकाज प्रामाणिकपणे व सचोटीने केले जाईल अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक व विद्यमान सचिव प्रवीण कटारिया यांनी दिली संस्थेच्या कार्यालयात चेअरमन व्हॉइस चेअरमन निवडीच्या प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी साहेब यांच्या उपस्थितीत चेअरमन पदी हाजी अल्ताफ शेठ तांबोळी व व्हाईस चेअरमन पद बाळासाहेब इंदुरे यांची अविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक मनोज पवार पांडुरंग जाधव शिरीष थोरबोले तरुण पटेल  नैनेश कटारिया श्रावण इंगोले सुनीताताई बनसोडे  आशादेवी पाटणे संस्थेच्या व्यवस्थापिका कुमारी करुणा पवार कॅशियर राठोड मॅडम हेड क्लर्क नम्रता मेहता पिग्मी एजंट शक्ती मनेरी प्रभावती दीक्षित लक्ष्मी हुंदाडे राहुल किरवे सौरभ आवटे संस्थेचे वसुली अधिकारी सुधीर कटारिया जण उपस्थित होते याप्रसंगी सहाय्यक निबंधक  दिलीप तिजोरे यांनी नव नियुक्त चेअरमन व्हाईट चेअरमन व संचालक मंडळास शुभेच्छा पर आपले विचार व्यक्त केले तसेच पतसंस्थेचे चेअरमन हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार व्हाईस चेअरमन बाळासाहेब इंदुरी यांनी मानले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *