युवा सोशल फाउंडेशन रावगाव यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी वाचनालयास ग्रंथ भेट
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे सरपंच दादासाहेब जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी रावगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श माजी मुख्याध्यापक दत्तात्रय कानडे, धगटवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष फुंदे, करमाळा नगरपालिका प्रशालेचे शिक्षक बलभीम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य फत्तेसिंह पाटील, प्रगतशील बागायतदार अंकुश पाटील, विविध सोसायटीचे माजी चेअरमन माणिक शिंदे, माजी सरपंच नामदेव शेळके, विजू भैया अंगारश्या, महादेव बुधवंत, लक्ष्मण पवार, हर्षद पवार, राहुल पवार, प्रकाश कांबळे ,आदि उपस्थित होते.
सरपंच दादासाहेब जाधव, दत्तात्रय कानडे, अंकुश काळे-पाटील यांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आले.
युवा सोशल फाउंडेशन चा सर्व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असून आतापर्यंत युवा सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून गावात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत, याचाच एक भाग म्हणून युवा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने गावातील वाचनालयास अनमोल ग्रंथ भेट देऊन त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे .ग्रंथ भेट दिल्याबद्दल वाचनालयाचे सचिव भास्कर पवार यांनी युवा सोशल फाऊंडेशन चे व अध्यक्ष अमोल मुळे, संतोष काळे-पाटील सर,आप्पा फुंदे,डॉ.मनोज कानडे व सर्व संचालक यांचे आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *