
अखेर टेंभुर्णी जातेगाव या महामार्गातील सर्व अडथळे दूर अशी माहिती गुलाबराव बागल यांनी सांगितले आहे
करमाळा प्रतिनिधी
अखेर टेंभुर्णी जातेगाव या महामार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यामुळे लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया चालू होणार आहे
या महामार्गाचे राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे हस्तांतर झालेले नव्हते गेल्या महिन्यात सदरची हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली परंतु केंद्राच्या गॅझेटमध्ये सदरहू महामार्गाचे प्रसिद्धीकरण झालेले नव्हते परंतु आता सदरहू गॅझेट प्रसिद्ध झालेले आहे त्यामुळे सदरहू महामार्ग केंद्राकडे अधिकृतरित्या वर्ग झालेला आहे आता राष्ट्रीय महामार्गाच्या सोलापूर कार्यालयाकडून लवकरच भूसंपादनाचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांचे कार्यालयास सादर होईल व भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल महामार्ग सोलापूर कार्यालयाचे प्रकल्प संचालक माननीय श्री चिटणीस साहेब व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्क्षम जिल्हा अधिकारी श्री शंभरकर साहेब या दोघांच्याही कामाचा झपाटा आपणा सर्वांना माहित आहे त्यामुळे आता या महामार्गाच्या कामाबद्दल कोणीही काळजी करण्याचे कारण राहिलेले नाही त्यामुळे करमाळा वासियांना लवकरच चांगले दिवस पाहायला मिळतील व या भागाचा विकास होण्यास निश्चितच मदत मिळेल सदरहू प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या लोकांचा सहभाग लाभला त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत विशेषतः या कामी श्रीयुत मंगेश चिवटे श्रीयुत प्रतीक शिंदे यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केलेले आहे मी त्यांचा आभारी आहे असे
गुलाबराव बागल यांनी सांगितले आहे


