करमाळा प्रतिनिधी

करमाळा मतदार संघातील महावितरण कडून केल्या जाणाऱ्या कामांचा तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आपण आढावा बैठक घेत असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर रोजी जेऊर ता. करमाळा येथे महावितरण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत आमदार कार्यालयाकडून अधिक माहिती देताना सांगण्यात आले की, आमदार नारायण आबा पाटील हे कायमच मतदार संघातील वीज प्रश्नी दक्ष राहीले असल्याने या विभागाकडून चालू व झालेल्या कामाबद्दल माहिती या बैठकीत स्वतः आमदार घेणार आहेत.

राज्याचे हिवाळी अधिवेशन दिनांक ८ डिसेंबर पासुन नागपुर येथे होत असल्याने या आढावा बैठकीतील वीज मागण्या व प्रश्न आमदार नारायण आबा पाटील यांचेकडुन मंत्री यांच्यासमोर सादर केले जाणार आहेत, शिवाय संधी मिळाल्यास सभागृहात मांडले जाणार आहेत. शुक्रवारी जेऊर येथे होणाऱ्या आढावा बैठकीत करमाळा मतदार संघातील वीजेची मागणी व होणारा वीज पुरवठा ३३/११ केव्हीए क्षमतेचे नवीन सबस्टेशन प्रस्ताव सद्यस्थिती, मतदार संघातील कार्यरत असलेल्या ३३/११ केव्हीए सबस्टेशनची सद्यस्थिती, भगिरथ तसेच विविध योजनेतील कामे, मतदार संघातील सबस्टेशनच्या क्षमतावाढी बाबत नवीन फिडरची मागणी, शेतीपंप व घरगुती वीज जोड ग्राहक संख्या प्रस्ताव, वीज पोल तारा व रौहित्र मागणी व पुरवठा सद्यस्थिती, ३३/११ केव्हीए सबस्टेशन वरील कर्मचारी नेमणुका सद्यस्थिती, महाविरण मधील कर्मचारी रिक्त पदे आदि विषयांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीस कार्यकारी अभियंता (विभागीय कार्यालय बार्शी) तसेच जेऊर करमाळा व कुर्डुवाडी उपविभाग सहायक अभियंते, सर्व सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेले शाखा अभियंता व ठेकेदार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *