
करमाळा प्रतिनिधी
रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेत, WAPCOS च्या सर्वे नुसार सबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल देत सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले असून सरकार या योजनेबाबत सकारात्मक असून ही योजना मार्गी लागण्याच्या वाटेवरील हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे असे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी केले.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जयकुमार गोरे यांच्या दालनात सदरील बैठक संपन्न झाली. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वजण आग्रही होते. तालुक्यातील चाळीस गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.
कुकडीचे पाणी करमाळा तालुक्याला पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी टेल टू हेड या क्रमाने पाणी दिले जाइल त्याच बरोबर अस्तरीकरणाचे काम देखील केले जाईल असे विखे पाटील यांनी सांगितल्याचे बागल यांनी सांगितले.
………………….
कुकडीचे पाणी, जलसंपदा मंत्री अन स्व. दिगंबरराव बागल यांची आठवण !
यावेळी कुकडीच्या योजनेसंदर्भात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांनी आपल्याकडे आग्रह केला असता स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आदेश दिले व सदरील योजना मार्गी लागली असा आवर्जून उल्लेख विखे पाटील यांनी केला.