करमाळा: करमाळा नगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून शहरातून अनेक जण काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून इच्छुकांनी 2-3 दिवसात करमाळा तालुका काँग्रेस आय तालुकाध्यक्ष श्री. प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रा. श्री सातलिंग शटगार सर यांनी केले. पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष शटगार सर म्हणाले की काँग्रेस (आय) पक्षाच्यावतीने उमेदवारांना संपूर्ण ताकत दिली जाणार आहे. करमाळा तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव नामदेवरावजी जगताप हे चांगले नेतृत्व तुम्हाला लाभले आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने देशभक्त स्व. नामदेवरावजी जगताप साहेब व स्व. अण्णासाहेब जगताप यांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे. स्व. नामदेवरावजी जगताप यांच्या कार्याचा आलेख संपूर्ण महाराष्ट्र राज्याला परिचित आहे.त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपली पुढील राजकीय वाटचाल करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना श्री प्रतापराव जगताप म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून करमाळा शहरामध्ये असलेली रस्त्याची दुरावस्था… धुळीचे साम्राज्य.. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा.. अश्या एक नाही तर अनेक समस्या गेल्या अनेक वर्षापासून शहरवासीयांना भेडसावत आहेत. संपूर्ण करमाळा शहरामध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असून विकासाच्या मुद्द्यावर आपण शहरवासीयासमोर नवीन चेहरे समोर देऊन मतदान मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहरात पुरोगामी विचाराची ताकत खूप मोठी आहे.त्यामुळे शहरातील जनता निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा आहे हे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री शटगार सर यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाबरोबर आघाडी झाली तर ठिक आहे. आघाडी नाही झाली तर काँग्रेस (आय ) पक्षाच्या वतीने नगरसेवक पदाच्या 20 जागा आणि नगराध्यक्षपदाची एक जागा स्वबळावर लढवाव्या असा सल्ला दिला.पुढे अधिक बोलताना श्री जगताप यांनी सांगितले की करमाळा शहर सातत्याने शाहू,फुले,आंबेडकर,
यांच्या पुरोगामी विचारावर चाललेले शहर आहे.लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील यांना करमाळा शहरवासियांनी मोठे मताधिक्य दिले.त्याच धर्तीवर आमदार सुद्धा मा. शरदचंद्रजी पवार पक्षाचे झाले.तीच लाट आजही आहे.करमाळा नगरपरिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित व्हावी अशी आपली मनोमन इच्छा असून महाविकास आघाडीतील घटक पक्षाची काय भूमिका आहे हे अद्याप आपल्याला माहिती नसून आपण मात्र जर आघाडी नाही झाली तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमा तुन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे शेवटी प्रतापराव जगताप यांनी सांगितले.यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे, युवक काँग्रेस आयचे शहराध्यक्ष सुजय जगताप, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष अण्णा साळवे,काँग्रेस महिला तालूकाध्यक्ष श्रीमती. सरस्वती बांगर,भटक्या विमुक्त जातीचे तालुकाध्यक्ष देवराव सुकळे. ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख.किसान सेलचे तालुकाध्यक्ष दादासाहेब कुदळे,
तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रमजान भाई मुलाणी. भटक्या विमुक्त जाती-जमाती करमाळा तालुका महिला उपाध्यक्ष श्रीमती सैनाबाई भोसले, करमाळा तालुका काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजी आवटे, नितीन रोडगे,नूरमोहम्मद आतार
आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.