
करमाळा प्रतिनिधी
श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय व करमाळा नगरपरिषदे तर्फे भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथी निमित्त करमाळा नगरपरिषदेचे कार्यालयीन प्रमुख स्वप्निल बाळेकर यांच्या हस्ते माझी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कर अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन प्रमुख स्वप्निल बाळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. भारताचे लोहपुरूष म्हणुन सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकीकरण करण्याचे महान कार्य केले आहे. त्यांनी ५६२ पेक्षा जास्त संस्थानांना एकत्र आणुन आजचा अखंड भारत निर्माण केला. त्यांच्या दुरद्रष्टी, धैर्य आणि कठोर निर्यक्षमतेमुळे त्यांना भारताचे लोहपुरूष म्हटले जाते. ते म्हणायचे “एकता हीच आपकी खरी ताकद है”. आजच्या काळात ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे. तसेच बाळेकर म्हणाले की, अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये आतापर्यंत महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही. परंतु कणखर नेतृत्वाच्या इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. व आपले नेतृत्व त्यांनी वेळोवेळी सिध्द करुन दाखवले.
या कार्यक्रमास सोमनाथ सरवदे, शशांक भोसले, आकाश वाघमारे, विपुल पुजारी, हिंदुराव जगताप, शितल बहाड, आश्विनी जाधव, सुप्रिया पालखे, सचिन घाटुळे, सचिन कांबळे, संकल्प शहाणे, तुषार टांकसाळे, विक्रम कांबळे, मल्हारी चांदगुडे, प्रदिप चौकटे, गजानन राक्षे, बाबा खराडे दत्तात्रय घोलप, अजिम खान आणि वाचन मंदिराचे सभासद वाचक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सोमनाथ सरवदे यांनी सुत्रसंचालन केले तर शशांक भोसले यांनी आभार व्यक्त केले.