
करमाळा प्रतिनिधी
दिपावली निमित्त करमाळा शहरातील गोरगरीब व आबाल वृद्ध तसेच मजुरी करणाऱ्या व पूरग्रस्त महिलांना दलित सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा निलावती बुवाजी कांबळे यांनी 40 क्विंटल गरा, मैदा व साखर वाटप केले. प्रति महिला 10 किलो याप्रमाणे 400 महिलांना वाटप करण्यात आले. यावर्षी सीना माईने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले व क्षणात संसार उध्वस्त झाला. अशा गरजवंत महिलांनी खचून न जाता सक्षमपणे उभे राहिले पाहिजे व इतर स्वयंसेवी संस्थांनी यांना मदत केली पाहिजे असे मत निलावती बुवाजी कांबळे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम करमाळा शहरातील संभाजीनगर येथे संपन्न झाला. लक्ष्मी भोसले, बबीता त्रिंबके, लक्ष्मण पवार, अमोल बोबडे व आदित्य भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पवार यांनी केले व बबिता त्रिंबके यांनी आभार मानले. पूरग्रस्तांमध्ये बळी गेलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
