
करमाळा प्रतिनिधी
आज करमाळा येथे कमलाभवानी साखर कारखानाचा दहावा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन (भाऊ) उबाळे यांच्या हस्ते पार पडला. कमलाभवानी साखर कारखाना करमाळ्यातील ऊस उत्पादकांचे आशा स्थान असून इथून पुढील काळामध्ये कमलाभवानी साखर कारखान्याच्या उसाचे पेमेंट लवकरात लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर ओला दुष्काळ भागातील ज्यांचे ऊस खरडून वाहून गेलेले आहेत अशा भागात लवकरात लवकर ऊसतोड करण्याचा विचार आम्ही करत आहोत, आपणही करावा अशी विनंती त्यांनी चेअरमन यांच्याकडे केली. माढा तालुक्याचे भाग्यविधाते मा.आमदार बबनरावदादा शिंदे व आम्ही सर्वच कमलाभवानी कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले.

कमलाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी देखील भाऊंच्या वाक्याला दुजोरा देत आपण सर्व ऊस उत्पादकाचे पेमेंट लवकरात लवकर करायचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मागील वर्षी गाळप हंगाम बंद असून देखील सर्व कर्मचाऱ्यांची 2500 रुपयांनी पगार वाढ करून १ ऑक्टोबर पासून पगारवाढ लागू करण्याचे घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर वाहन मालकांचे देखील उर्वरित हप्ता लवकरच सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मागील गाळप हंगाम बंद असला तरी त्याच्या मागील हंगामामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये खाजगी कारखान्यांमध्ये सर्वाधिक २८५०/-रु दर दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी उपजिल्हाधिकारी राजेंद्र बारकुंड यांनी देखील कारखान्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा पर भाषण करून सर्व ऊस उत्पादकांनी कमलाभवानी साखर कारखाना ऊस पुरवठा करण्यासाठीचे आव्हान केले. त्याचबरोबर निंभोरेचे लोकनियुक्त सरपंच रवी वळेकर यांनी देखील कमलाभवानी कारखान्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा पर भाषण करून सदिच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहास (बापू) निमगिरे यांनी देखील करमाळा तालुक्यातील कमलाभवानी साखर कारखाना एकमेव ऊस उत्पादकाचे अशा स्थान असल्याचे सांगून हा कारखाना योग्य मार्गाने चाललेला असून त्याच्या गाळप हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक (दादा) पाटील, महाराष्ट्र केसरी पै. चंद्राहास (बापू) निमगिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत (भाऊ) अवताडे, माजी सरपंच टाकळी चे डॉक्टर गोरख गुळवे, मा. जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळसर, प्रगतिशील बागायतदार तात्यामामा सरडे, मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूरचे राजेंद्र बारकुंड, मांगी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुजित (तात्या) बागल, निंभोरेचे लोकनियुक्त सरपंच रवी वळेकर, पुढारीचे दैनिक पत्रकार अशपाक सय्यद, शहाजी बापूजी झिंजाडे, डॉक्टर सुभाष शेंद्रे, शशिकांत सरडे, समाधान भोगे, शंकर जाधव, तुकाराम क्षिरसागर, तात्या पाटील, बाप्पा चव्हाण, गोरख मस्के, संग्राम मस्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर अरविंद चौधरी, डेप्युटी जनरल मॅनेजर रामचंद्र क्षिरसागर, वर्क्स मॅनेजर समाधान गायकवाड, चीप अकाऊंट ऑफिसर आनंदराव उबाळे, चीफ केमिस्ट विनोद जाधव, मुख्य शेती अधिकारी शांताराम जगदाळे, शेती अधिकारी समाधान पाटील, प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप स्टोअरकीपर सय्यद, सिव्हिल इंजिनिअर टोणपे, ऊस पुरवठा अधिकारी सुजित शिंदे, सुरक्षा अधिकारी शिवाजी अनारसे इत्यादी अधिकारी, कर्मचारी व सर्व कामगार बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.