
करमाळा प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश तिवारी याने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला असून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच गवई यांच्या मातोश्रीने आरएसएस च्या दसरा मेळाव्यास जाण्यास जाहीर नकार दिला म्हणून हा प्रकार घडलेला असल्याचा संशय असल्याचे आरपीआय (आ) चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही सांगितलेल्या अजेंड्यावर काम केले नाही तर सरन्यायाधीश असो की आणखी कोणी, कोणाचीही गय केली जाणार नाही असा प्रत्यक्ष संदेश आरएसएस च्या वतीने दिला आहे. अगदी पंतप्रधान मोदी यांनी देखील आरएसएस च्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाले म्हणून लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात तोंडभरून कौतुक केले आहे.
एका बाजूला दलित राष्ट्रपती आम्ही केल्याचा प्रचार चालू आहे तर दुसऱ्या बाजूला या गोष्टींवर कसलीही प्रतिक्रिया पंतप्रधान देत नाहीत.
सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील तहसीलदार व पोलीस निरीक्षक तसेच महामहिम राष्ट्रपती यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
सदरचे लेखी निवेदन नायब तहसीलदार जाधव यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, भीमराव कांबळे, बाळासाहेब कांबळे, संकेत कांबळे, संकेत कांबळे, बाळासाहेब लांडगे, संदीप जगताप, रवींद्र जाधव, मच्छिंद्र कांबळे, नाना शिंदे, नंदकुमार चव्हाण, अतुल राक्षे, सतीश राक्षे, जितेंद्र शिंदे,पप्पू शिंदे, ओंकार गायकवाड, दत्ता चव्हाण,इ. उपस्थित होते.