करमाळा प्रतिनिधी

शुक्रवार दिनांक 10-10-2025 रोजी हिंदू योद्धा आमदार संग्राम (भैय्या) जगताप व हिंदू योद्धा आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे सकाळी (11-00) अकरा वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार असून बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान सकल हिंदू समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करमळा शहरातील मौलालीचा माळ येथे ग्रामदैवत पूजना वेळी हिंदू वडार समाजावर काही समाजकंटक जिहादी लोकांनी बेदम मारहाण करून दगडफेक केली त्यात सात जण गंभीर जखमी झाले याची फिर्याद देण्यास पोलीस स्टेशनला जखमी वडार समाजातील लोक गेले असता जिहादीच्या दबावापोटी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी फिर्याद घेण्यास नकार दिला.

पोलीस प्रशासनाच्या या भूमिके विरोधात व हिंदू वडार समाजातील अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी लव्हजिहादीचे आक्रमण, जिहादीचे बेकायदेशीर अतिक्रमण, गोरक्ष प्रमुखावर होणारे हल्ले या सर्वांना आळा बसण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू योद्धा आमदार संग्राम (भैय्या) जगताप व हिंदू योद्धा आमदार अमोलजी खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक 11-00 वाजता श्री देवीचा माळ येथून मोर्चा निघून छत्रपती चौक, सुभाष चौक या ठिकाणी सभा होईल यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान सखलहिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *