
करमाळा प्रतिनिधी
कराड जिल्हा सातारा येथील श्री मळाई देवी नागरी पतसंस्था, श्री मळाई देवी शिक्षण संस्था, श्री मळाई ग्रुप या संस्थांच्या वतीने शेती मित्र अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शना नुसार सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांना भरीव मदत करण्यासाठी अशोकराव थोरात यांचे हस्ते श्रीफळ वाढवून मदत साहित्य असलेला ट्रक सोलापूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आला होता.

डॉ.स्वाती थोरात व डॉ.अश्विनी घाडगे-ठोंबरे यांच्या विनंतीनुसार करमाळा तालुक्यातील तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव आदी गावातील १३७ पूरग्रस्तांना गहू, तांदूळ, साखर, विविध प्रकारच्या डाळी, तिखट, खाद्यतेल, चहा पावडर, शेवया, गुळ, साडी, लहान मुलांची कपडे व विद्यार्थ्यांना स्टेशनरी इत्यादी साहित्य देऊन मदत करण्यात आली.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेतून विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितिचे सामाजिक भान यावे या उद्देशाने ऐच्छिक मदतीचे आवाहन केले होते, त्यातून आलेल्या मदती मध्ये श्री मळाई देवी नागरी पतसंस्थेतून भरीव मदत घालून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.
त्याबरोबरच माढा तालुक्यातील दारफळ सीना या गावामध्येही ५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व कपडे या रूपात मदत पुरविण्यात आली. याव्यतिरिक्त इतर गावांमध्ये २०० महिलांना साडी वाटप व लहान मुलांचे कपडे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री मळाई देवी नागरी पतसंस्थेचे चेअरमन अजित काका थोरात, श्री मळाई ग्रुपचे गरुड सर यांचे मार्गदर्शनानुसार करमाळा येथील शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमरजित साळुंके, भीमराव माहूर, तुळशीराम शिर्के, अमोल जाधव, अनिल शिर्के, शेखर शिर्के, मुख्याध्यापिका ज्योती शिंदे व सहकारी, मळाईदेवी शिक्षण संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, पतसंस्थेचे सर्व शाखांचे शाखाप्रमुख यांनी योग्य नियोजन करून मदतीचे पूरग्रस्तांना वाटप केले.