करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील किल्ला वेस मारुती मंदिर ते करमाळा नगरपरिषद हा रस्ता वाहतुकीसाठी धोका दायक झालेला आहे.

सदर रस्त्यावरुन महात्मा गांधी विद्यालय, शिकवणुकीसाठी लहान लहान विद्यार्थ्यांना जावे लागते तसेच या रस्त्यावरुन रहदारी चालू असते तर स्थानिक नागरिक ही समोरच रहात असुन बुरुज सध्या होणारे पावसाने ढासळत चालला आहे.

सदर बुरुज किल्लाची मालकी पुरातन खात्याची आहे. गेल्या वर्षी पुरातन खात्याने डाग ढुगी दुरुस्ती साठी अंदाजे दोन कोटी रुपये आल्याचे समजते. सदर वाहतूकीच्या रस्त्यावरील दुरुस्ती करणे गरजेचे असताना पलीकडच्या बाजूला दुरुस्ती करण्यात आली आहे

सदर रस्त्यावरुन श्री गणेश मिरवणुक काढण्यात येत होती परंतु किल्लयाचा बुरुज ढासळुन दुर्घटना घडू नये म्हणून मिरवणुकीसाठी सदर रस्ता बंद करण्यात आला आहे.

 पुरातन खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सदर बुरुजाची त्वरित  दुरुस्ती करण्यात यावी व होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी फारुक जमादार सामाजिक कार्यकर्ता यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *