
करमाळा प्रतिनिधी
श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवाडी यांच्या वतीने तालुक्यातील पूरग्रस्तांना ‘एक हात मदतीचा’ समजून तालुक्यात अलीकडील काळात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंबे व नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची तीव्र गरज निर्माण झाली आहे

या कठीण परिस्थितीत संस्थेच्या वतीने पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याचा संकल्प करुन संस्था, विद्यार्थी-पालक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व वाहन चालक यांच्या सहयोगाने पूरग्रस्तांना उत्तम दर्जाचे जिवनाआवश्यक वस्तू पोहोचविण्यात आले आहे.
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे मँडम यांना पूरग्रस्तांच्या मदती संदर्भात साहित्य देण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने संस्थेमार्फत मदतीचे वितरण गरजूंना योग्य पद्धतीने जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, तहसिलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी अमित कदम यांच्या व संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी,मुख्याध्यापिका धनश्री दळवी, शिक्षक, कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने सर्व साहित्याचे वितरण करण्यात आले आहे