करमाळा प्रतिनिधी

2004 ते 2009, 2009 ते 2014 व 2014 ते 2019 या कार्यकाळात तालुक्यात 3 वेगवेगळे आमदार होते. या कालावधीत तालुक्याचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी किती नवीन सबस्टेशन मंजूर झाली ?  किती सबस्टेशनची क्षमता वाढ झाली ? याची माहिती घ्या व 2019 ते 2024 या कालावधीत किती सबस्टेशन व किती सबस्टेशनची क्षमता वाढ झाली याची तुलना व

अभ्यास करून विचार करा. आपण जात किंवा भावनेवरती मत मागत नसून आपण विकास कामांच्या जोरावरती मतं मागत असतो आणि त्यामुळेच 2019 ते 2024 या कालावधीत आपण तालुक्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी 3 नवीन सबस्टेशन व जवळपास 15 सबस्टेशन ची क्षमतावाढ करून घेतली त्यामुळे वीज प्रश्न सुटण्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याचा मनस्वी आनंद होत असून इथून पुढेही आपल्याकडे आमदारकी नसली तरी विकास कामे सुरूच राहणार तुंम्ही निश्चित रहा असे प्रतिपादन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी राजुरी येथील 33 /11KVA  सबस्टेशनच्या लोकार्पण प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे हे होते.

यावेळी नंदकुमार जगताप, आर आर बापू साखरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने संजयमामा शिंदे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व त्यांचे आभार व्यक्त केले. अध्यक्ष मार्गदर्शन बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते वामनदादा बदे, ॲड. नितीनराजे भोसले, सतीशबापू शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक पाटील,चिखलठाण गावचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ बारकुंड, वाशिंबे गावचे सरपंच तानाजी बापू झोळ, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, उध्दवदादा माळी, डॉ.गोरख गुळवे, भरत आप्पा खाटमोडे,

निळकंठ अभंग, युवा नेते आण्णासाहेब पवार, राजेंद्र बाबर, अशोक तकीक, अनिल शेजाळ, अनिल केकान, सचिन गावडे, शंकर कवडे, उदय पाटील, पै.उमेश इंगळे, बापू तांबे, स्वप्निल पाडूळे, नंदकुमार जगताप, आर.आर.बापू साखरे, संजय साखरे, भाऊसाहेब साखरे, उदय साखरे, नवनाथ दुरंदे, आत्माराम दुरंदे, आप्पा निरगुडे, धनंजय जाधव, संजय साखरे, सुनिल पाटील, नवनाथ साखरे, आप्पा टापरे, वसंत भोईटे, दादा साखरे, संदिपान साखरे, आबा साखरे, दत्तू बोबडे, डॉ.फाळके, विठ्ठल देशमुख, प्रविण साखरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *