करमाळा प्रतिनिधी  

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बी. ए. भाग 3 हिंदी विषयाच्या सहा विद्यार्थ्यांची दि. 04/07/2025 ते 10/07/2025 या कालावधीत बुंदेलखंड विद्यापीठ, झाँसी व केंद्रीय हिंदी संस्थान, आगरा (उत्तरप्रदेश) येथे संपन्न होणाऱ्या छात्र अध्ययन यात्रेसाठी निवड झाली आहे. ही निवड अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी असून ज्यांची मातृभाषा हिंदी नाही अशाच विद्यार्थ्यांची हिंदी विषय घेऊन बी. ए. ची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. एकुण 15 विद्यार्थ्यांचे अर्ज केंद्रीय हिंदी

निदेशालय, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविले होते त्यातील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. कुंदन आवटे, हर्षद बोराटे, सुधीर निशाद, मोईन काझी, मंगेश कोलते, निखिल क्षिरसागर या विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील,

उपप्राचार्य तथा हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. अनिल साळुंखे, प्रा. डॉ. विनायक खरटमल तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले व छात्र अध्ययन यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर यात्रे दरम्यान होणारा खर्च केंद्रीय हिंदी निदेशालय करते. या निवडीसाठी प्रा. डॉ. अनिल साळुंखे यांनी पाठपूरावा केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *