
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील प्राचीन व श्रद्धास्थान असलेले श्री आदिनाथ महाराज मंदिर, श्रीक्षेत्र संगोबा येथे दिनांक २८ ते ३० जून २०२५ या कालावधीत तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे गेल्या वर्षभरापासून नर्मदेश्वर गुरुजी यांच्या प्रेरणेतून भक्तपरिवाराने आरंभ केलेल्या ३६५ दिवस अखंड सात्विक नैवेद्य अर्पण सेवा (श्रीभोग व्रत) याची वर्षपूर्ती होणार असून, त्यानिमित्ताने भव्य धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.

कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
शनिवार, २८ जून २०२५
दुपारी ३.०० वाजता — श्रीमद्भगवद्गीता पूजनासह भव्य पालखी पदयात्रा
मार्ग: कमलाई माता मंदिर, करमाळा ते श्री आदिनाथ महाराज मंदिर, संगोबा
पालखीत: नर्मदा मैया, कुलस्वामिनी कमलाई माता आणि श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ
रविवार, २९ जून २०२५
सकाळी ९.०० वाजता — लघुरुद्र अभिषेक
सोमवार, ३० जून २०२५
सकाळी ७.०० वाजता — रुद्र स्वाहाकार यज्ञ
दुपारी १.०० वाजता — महाप्रसाद

या तीन दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, फुलांची सजावट व भक्तिमय वातावरण असेल. पालखी सोहळ्यादरम्यान टाळ-मृदंग, वाद्यवृंद, जयघोष आणि भक्तांच्या उपस्थितीत संगोबा परिसर भक्तिरसात दुमदुमून जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नर्मदेश्वर गुरुजी (मो.: ९८९०८०१९५८) यांच्याशी संपर्क साधावा.
श्री आदिनाथ महाराज भक्त परिवारातर्फे सर्व श्रद्धाळू भाविकांना या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.