करमाळा प्रतिनिधी

वडगाव दक्षिण व उत्तर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी चंद्रकांत काळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आज जेऊर तालुका करमाळा येथे आमदार कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी नूतन सरपंच चंद्रकांत रामचंद्र काळे यांचा सत्कार केला. यावेळी संचालक व

माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट राहुल सावंत, संचालक देवानंद बागल, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, संचालक राजाभाऊ कदम, माजी सरपंच गणेश अंधारे, माजी सदस्य सुदाम काळे, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव सरक सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वडगाव दक्षिण उत्तर ग्रामपंचायतीस माझे पूर्ण सहकार्य राहणार असून या गावातील नागरिकांच्या रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी शासनाकडून विविध माध्यमातून निधी मिळवून दिला

जाईल तसेच या परिसरातील मांगीतलावाचा समावेश कुकडी प्रकल्पात करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसेच नियोजित रीटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनीचे ओव्हर फ्लो पाणी मांगीतलावात सोडण्यासाठी ही शासनाकडे आपण आग्रही आहोत. वडगाव दक्षिण उत्तर व परिसरातून विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार नारायण आबा पाटील यांनी दिले. उपस्थिताचे आभार राहुल गोडगे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *