करमाळा प्रतिनिधी

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाची विद्यार्थिनी सई लहू तनपुरे हिचा फेब्रु.2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 97.80% गुण मिळवून करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक तर आलेलाच होता तरी तिने पुणे बोर्डाकडे गुणपडताळणी साठी अर्ज केला असता सदर पडताळणी मध्ये तिच्या मूळ गुणामध्ये 8 गुणांची वाढ झाली असून आता तिची टक्केवारी 99.40% झाली आहे व ती अजूनही तालुक्यात प्रथमच आहे. त्याच बरोबर तिला गणित विषयात 100 पैकी 100 प्राप्त झालेले आहेत. तिला गणित विषय शिकवणारे काझी सर, खाटमोडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल जाधव सर, उपमुख्याध्यापक भस्मे सर, पर्यवेक्षक अंकुशखाने सर यांनी विद्यालयाच्या वतीने सई तनपुरे हिचे हार्दिक अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *