करमाळा प्रतिनिधी  

आवाटी ता. करमाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ३१ मे ते ५ जून पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये ३१ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व ध्वजस्तंभ पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांना कै. जनाबाई एकनाथ खताळ सार्वजनिक वाचनालय आवाटी यांच्याकडून बक्षीस वितरण करण्यात आले.

१ जून रोजी प्रा. संभाजी ओहोळ सर, कडा ता.आष्टी यांचे “अहिल्यादेवींचे सामाजिक व धार्मिक कार्य” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. २ जून रोजी प्रा. सोमनाथ गुंजाळ सर, भूम जि. धाराशिव यांचे “अहिल्यादेवी एक महान समाज सुधारक” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ३ जून रोजी ह.भ.प. योगिताताई डोंबाळे, कर्जत जि.अहिल्यानगर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. ४ जून रोजी बाळूमामा ओवीकार मंडळ, सावखेड ता.वाळवा जि.सांगली यांचा “धनगरी ओव्या” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ५ जून रोजी गावातून अहिल्यादेवी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत गावातील सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. सहकार्याबद्दल व सहभागाबद्दल उत्सव समितीने सर्वांचे आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *