
करमाळा प्रतिनिधी
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्थळावरती मेन रोडच्या दोन्ही बाजूने व्हा. चेअरमन महेंद्र पाटील तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. मेन रोडच्या दुतर्फा कारखान्याच्या

आतील बाजूस वाहन तळावरती वृक्षारोपण करून भविष्यामध्ये आदिनाथ वरती पूर्णपणे हिरवाई व्हावी. वृक्षारोपण करताना आदिनाथ व्हॉइस चेअरमन महेंद्र पाटील, संचालक देवानंद बागल, दत्ता बापू देशमुख, विजयराव नवले, संतोष पाटील, विजय अंबोदरे, नेमिनाथ चौधरी, रामेश्वर तळेकर, हनु आबा सरडे, आदी जण उपस्थित होते.
