करमाळा प्रतिनिधी

कुगाव(कुर्मग्राम) ता. करमाळा जि सोलापूर हे ठिकाण भीमा नदीच्या काठी असून कुगाव ला भीमा नदीच्या पात्राने तिनही बाजूला वेढले आहे. कुगाव गावच्या नदी पात्रासमोर सात गावांचे क्षेत्र असून यात सोगाव, वाशिंबे, गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ या गावांचा समावेश होतो. सध्या कुगाव गावात जाण्यासाठी चार जलमार्ग (शिरसोडी ते कुगाव, कालठण त कुगाव, कळाशी ते कुगाव, गंगावळण ते कुगाव) व एक भुमार्ग (जेऊर ते कुगाव प्रजिमा ११) मंजूर आहे. भुमार्गाने जाण्यासाठी १२० किलोमीटर चा नाहक वळसा मारावा लागतो तर जल मार्गाने जाण्यासाठी शासनाने चार मार्ग मंजूर केले आहेत पण शासकीय बोटी किंवा जलथांबे अशा कोणत्याही प्रकारचा सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यामुळे पंचक्रोशीतील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन खाजगी नौकांचीच मदत घ्यावी लागते.

कुगाव ते इंदापूर जोडपूलाच्या कामाबाबत सरपंच पदावर कार्यरत असल्यापासुन सातत्यपूर्ण केलेल्या सकारात्मक पाठपुराव्यास इंदापूर चे आमदार तथा कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सहकार्य अन् महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा भक्कम पाठिंबा यातून जोडपुलाचे काम विधानसभेत मंजूर करून घेण्यात आले सध्या जोडपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळत आहे.

कुगाव ते इंदापूर जोडपुलाचे कुगाव पंचक्रोशीला होणारे फायदे

कुगाव पंचक्रोशीला पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग १० मिनिटाच्या अंतरावर येणार, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग कुगाव मार्गे तयार होणार, कुगाव पंचक्रोशीतील आर्थिक उलाढाल प्रचंड वाढणार, कुगाव पंचक्रोशीतील तरकारी मालाला पुणे मुंबई बाजारपेठ तात्काळ उपलब्ध होणार, कुगाव पंचक्रोशीतील उसासाठी पुणे जिल्ह्यातील पर्यायी साखर कारखाने उपलब्ध होणार (दौंड शुगर, माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती, बारामती ॲग्रो, कर्मयोगी, निरा भीमा), केळी निर्यातीस JNPT Mumbai बंदरावर जाण्यासाठी कुगाव परिसरातून सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होणार (सध्या भारतातून सर्वाधिक केळीची निर्यात उजनी बॅकवॉटर परिसरातून होते), कुगाव पंचक्रोशीत रोजगार निर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार, उजनी बॅकवॉटर टुरिझम ट्रॅन्गल परिसरातील कुगाव पर्यटनाचा विकास होणार (भिगवन – टेंभूर्णी- कुंभेज – भिगवन), हनुमान भक्तांची मागणी असणारा मार्ग पूर्ण होऊन हनुमान भक्तांची गैरसोय दूर होणार, चिखलठाण येथील कोटलिंग देवस्थान ला भेट देणाऱ्या कोटलिंग भक्तांची गैरसोय दूर होणार, कुगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय (इंदापूर, अकलूज, भिगवण, बारामती) होईल, कुगाव पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा (इंदापूर, अकलूज, बारामती, पुणे) उपलब्ध होणार, उजनी बॅकवॉटर परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण होणार, उजनी बॅकवॉटर परिसरातील कुगाव पंचक्रोशीतील बोटींग व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार, उजनी धरणात साधारण ६०,००० कोटी+ ची वाळू आहे त्यासाठी कुगाव मार्गे पर्यायी मार्ग तयार होणार, कुगाव पंचक्रोशीतील बलुतेदार अन् अलुतेदार यांच्या पारंपारिक व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार, कुगाव पंचक्रोशीत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल, रोटी बेटी चे संबंध वाढणार, कुगाव पंचक्रोशीतील मासेमारी बांधवांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार, कुगाव पंचक्रोशीच्या परिसरातील जमीनीच्या किंमती प्रचंड वाढणार, कुगाव पंचक्रोशीत वाहतुकीची सोय उपलब्ध झाल्याने आपल्या परिसरात मोठ मोठे उद्योग धंदे वाढण्यास मदत मिळणार, आपल्या परिसरात मुबलक पाणी साठा असल्याने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात घरे वाढणार, शहरी भाग व ग्रामीण भाग अंतर कमी होण्यास मदत होणार, कुगाव पंचक्रोशीतील फोटोग्राफी व्यवसायाला पर्यटकांमुळे चांगल्या पद्धतीने व्यवसाय वाढवण्याची संधी उपलब्ध होणार, व्यवसाय वाढल्याने जाहिरात क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होणार, कुगाव पंचक्रोशीतील बेरोजगार युवकांना गावातच रोजगार निर्माण होणार, कुगाव पंचक्रोशीतील चारचाकी वाहनांचा सरडेवाडी ता इंदापूर येथील टोलनाका माफ होणार, कुगाव पंचक्रोशीतीतून प्रस्तावित पुरंदर विमानतळ दीड तासाच्या अंतरावर येणार.

     सदर जोडपुलामुळे येत्या काळात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राशी उजनी बॅकवॉटर परिसरातील कुगाव पंचक्रोशीतून सर्वात जवळच्या मार्गाने जोडला जाणार आहे. पर्यायाने दळणवळण प्रचंड वेगात वाढणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील आवाटी, गौंडरे, सालसे, साडे, निंभोरे, वरकरणे, कोंढेज, जेऊर, जेऊरवाडी, शेटफळ, पोफळज, दहिगाव, लांडाहिरा, केडगाव, सोगाव(पु), चिखलठाण १, चिखलठाण २, कुगाव परिसरातील रोडटच जागांना या जोडपुलाचा प्रचंड लाभ होणार आहे – तेजस्विनी दयानंद कोकरे मा. सरपंच ग्रामपंचायत कुगाव

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *