
करमाळा प्रतिनिधी
रावगाव तालुका करमाळा येथे महा एनजीओ फेडरेशन व नवभारत प्रतिष्ठान यांच्यावतीने विश्वगुरू प.पू. रविशंकर गुरुदेव यांच्या 69 व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 13 रोजी रावगाव येथील महादेव मंदिर व परिसर स्वच्छ करून महामृत्युंजय जपाचे आयोजन पठण करण्यात आले. जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु मानवतेचे मार्गदर्शक, सुदर्शन क्रिया ध्यानधारणा व सेवा कार्याने लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रतिसाद आणि परिवर्तन घडवणारे गुरुदेव हे समतेचे शांततेचे व प्रेमाचे प्रतीक आहेत प.पू. रविशंकर गुरुदेव यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक व गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाप्रमाणे आध्यात्मिक उपक्रमही राबविण्यात आला यामध्ये गावातील एकूण 32 भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला.

ग्रामपंचायत सदस्य छाया पवार व पै. दादा पवार या उभयतांचे हस्ते महादेवाच्या पिंडीवर महारूद्राभिषक करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भास्कर पवार, शिवभक्त लक्ष्मण पवार, राहुल गोसावी, पुजारी अंकुश पाटील, बाळासाहेब गुरव, सीताबाई गुरव, भाऊराव फुंदे, बाळासाहेब रासकर, जयंत बर्डे, मधुकर पुणेकर, अनिश कांबळे, सुरेश फुंदे, हर्षद पवार, हेमंत पवार, समर्थ पवार, छाया पवार, ताई फुंदे, जनार्दन फुंदे आदी भक्त उपस्थित होते.
महाआरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. सर्व भक्तांचे आभार संस्थेचे सचिव प्रकाश कांबळे यांनी मांनले.