करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने महाविद्यालयामध्ये सकाळी 7.30 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर 9.30 वाजता महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये इयत्ता अकरावीतील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य संभाजी किर्दाक हे उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थी प्रतीक खिलोशिया, वैष्णवी क्षीरसागर, वासाणी यशवी व शिवांजली कुदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन 2024-2025 शैक्षणिक वर्षातील कला शाखेचा निकाल 94.56% , वाणिज्य शाखेचा निकाल 97.50% व विज्ञान शाखेचा निकाल 99.16 लागला आहे. या प्रत्येक शाखेतील प्रथम 03 क्रमांक पुढीलप्रमाणे कला शाखेतील प्रथम 03 विद्यार्थी गुरव वैष्णवी राजेंद्र प्रथम क्रमांक 93.37%, क्षीरसागर वैष्णवी दत्तात्रय द्वितीय क्रमांक 91.33, नेटके वर्षाराणी विजय 82.80, वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांक वासानी यश्वी राजेंद्र 95.50%, खिलोशिया प्रतिक संदीप 92.50, गायकवाड पूजा संभाजी 92.00% तर विज्ञान शाखेतील प्रथम तीन क्रमांक प्रथम क्रमांक कुदळे शिवांजली दिगंबर 96.83, द्वितीय क्रमांक कसबे संयोजिता बाळू 96.50 व द्वितीय क्रमांक चव्हाण ज्योती संदीप 96.50, तृतीय क्रमांक वीर ज्ञानेश्वरी राजेंद्र 96.00%.

या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात भरपूर कष्ट करून यशस्वी व्हावे असे सांगितले. यावेळी परीक्षा विभागाचे कामकाज प्रा.विजय वारुळे, प्रा.पी.एस कुदळे, प्रा. संध्या बिले व प्रा.डॉ. मुक्ता काटवटे व प्रा.डॉ. हरिदास बोडके यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संध्या बिले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मुक्ता काटवटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.विजय वारुळे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *